Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : लता मंगेशकर यांची प्रकृती गंभीर

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई : बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांची प्रकृती पुन्हा चिंताजनक झाली असून त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्या सध्या आयसीयूमध्ये आहेत.लता मंगेशकर या ९२ वर्षांच्या आहेत. लता मंगेशकर यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यासोबतच त्यांना न्यूमोनियाही झाला होता. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. आता पुन्हा त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती गंभीर असून तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती ब्रीच कँडी रुग्णालयाचे डॉक्टर प्रतीत समदानी यांनी दिली आहे. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे लता मंगेशकर यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ब्रीच कँडी इस्पितळात गेले आहेत.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!