Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AccidentNewsUpdate : भीषण अपघातात कारचा चुराडा , पाच जण जागीच ठार

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई : मुंबई-पुणे महामार्गावर एका कारला आज  सकाळी झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची  दुर्घटना  घडली आहे. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये अपघातग्रस्त  कारचा पूर्णतः चुराडा झाला आहे. कंटेनर आणि कारमध्ये धडक झाल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. शिलाटणे गावाजवळ ही घटना घडली. अपघातातील मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. HR 26 CK 7805 असा या कारचा नंबर आहे.

Advertisements

लोणावळा ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी  दिलेल्या माहितीनुसार सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ही कार मुंबईहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने येत असताना कारचालकाचे  कारवरचे  नियंत्रण सुटले. शिलाटणे गावाजवल महामार्गावर ही कार दुभाजक ओलांडून पलीकडच्या दिशेला गेली. कारचा वेग इतका होता की समोरून येणाऱ्या कंटेनरच्या खाली ही कार घुसली.

Advertisements
Advertisements

हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये कारचा पूर्णपणे चुराडा झाला. यात कारमधील पाचही जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.दरम्यान, मृत प्रवाशांची ओळख अद्याप पटलेली नसून त्यासंदर्भात लोणावळा ग्रामीण पोलीस अधिकचा तपास करत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!