परमबीर सिंह यांना फरार घोषित करण्याची तयारी सुरु…

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहांविरोधात मुंबई, ठाणेसह अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले असून, कायदेशीर प्रक्रियेनंतर परमबीर सिंह यांना राज्य सरकार फरार घोषित करणार आहे. राज्य सरकारने परमबीर सिंह यांचा पगार थांबवला आहे. पोलीस महासंचालकांनी परमबीर सिंह यांच्यासह 25 पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे निवेदन गृहमंत्रालयाला दिले आहे. मात्र गृह मंत्रालयाने प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर असलेल्या आरोप विस्तृत स्वरूपात देण्यास पोलीस महासंचालकांना सांगितले आहे.

Advertisements

राज्यात विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाल्यानंतर आता परमबीर सिंह आणि इतर पोलिस अधिकारी ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत त्यांना निलंबित करण्याचे निवेदन पोलीस महासंचालकांनी गृह विभागाला दिले आहे. मात्र गृह विभागाने सावध भूमिका घेत अधिकाऱ्यांवर असलेल्या आरोपांची विस्तृत माहिती पोलीस महासंचालक कार्यालयाकडून मागवली असून. संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर किती गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत याची माहिती गृहमंत्रालयाला हवी आहे ज्या नंतर यावर त्यांच्याकडून निर्णय घेण्यात येईल.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!