ढिसाळ नियोजनामुळे मोदींच्या सभेत गोंधळ , खुर्च्यांची फेका फेक !! : बिहारात गयाच्या सभेतील घटना

Advertisements
Advertisements
Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचाराला सुरुवात केली असून, ते बिहारमधल्या गया येथे सभेला संबोधित करत आहेत. मोदी रॅलीला संबोधित करत असतानाच लोकसभा निवडणुकीच्या रॅलीमध्ये मोठी चेंगराचेंगरी झाली आहे. या चेंगराचेंगरीदरम्यान लोकांनी एकमेकांवर खुर्च्या फेकल्या आहेत. ढिसाळ नियोजनामुळे ही चेंगराचेंगरी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Advertisements

मोदींनी एनडीए उमेदवाराच्या प्रचारासाठी गयामध्ये जनतेला संबोधित केलं. त्यावेळी सभास्थळी ठेवलेल्या खुर्च्या कमी पडल्या आणि चेंगराचेंगरी झाली. दरम्यान काहींनी एकमेकांवर खुर्च्याही फेकल्या. त्यामुळे सभास्थळी एकच गोंधळ उडाला. रॅलीदरम्यान दोन गट एकमेकांना शिवीगाळ करत होते, त्यानंतर ते हाणामारीवर उतरले. म्हणून सभेच्या इथली परिस्थिती बिघडली. लोक खुर्च्या उचलून एकमेकांच्या दिशेनं फेकू लागले. रॅलीमध्ये सहभागी असलेल्या लोकांनी एकमेकांच्या डोक्यात त्या प्लॅस्टिकच्या खुर्च्या घातल्या. त्यानंतर काही जणांनी सभा स्थळावरून पळ काढला. पोलिसांनी तात्काळ सभेच्या स्थळावर येत जमावाला पांगवलं आणि परिस्थिती नियंत्रणात आली.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!