Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

JalgaonNewsUpdate : मांजामुळे दुचाकीस्वार डॉक्टरच्या गळ्यावर पडले ११ टाके, रिक्षाचालकांच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्राण

Advertisements
Advertisements
Spread the love

जळगाव : दुचाकीवरून जात असताना गळ्याला मांजा अडकून झालेल्या अपघातात एका विद्यार्थी डॉक्टरचा काळ आला होता पण वेळ आली नव्हती म्हणून प्राण वाचल्याची घटना जळगाव शहरात घडली आहे. या डॉक्टरच्या गळ्यावर ११ टाके पडले आहेत. दरम्यान, घटना घडल्यानंतर देखील डॉक्टर १० मिनिटे जागीच पडून होते परंतु एका रिक्षाचालकाने वेळीच प्रसंगावधान दाखविल्याने डॉक्टरचे प्राण वाचले आहेत.

Advertisements

याविषयीची अधिक माहिती अशी कि , अमरावती येथील जवाद अहमद यांचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाले असून जळगावात ते सध्या प्रशिक्षण घेत आहेत. डॉ. अहमद हे सालार नगरात राहत असून ते दुचाकीने जात असताना महामार्गालगत असलेल्या पेट्रोल पंपाजवळ चायना मांजा अचानक त्यांच्या गळ्यावर आला आणि लागलीच त्यांचा गळा कापला गेला.

Advertisements
Advertisements

डॉ. अहमद यांचा गळा कापल्यानंतर ते रक्तबंबाळ अवस्थेत दुचाकीसह खाली कोसळले. स्वतः डॉक्‍टर असल्याने त्यांनी स्वतःची सुरक्षा लक्षात घेत रक्तस्त्राव रोखण्यासाठी गळा दाबून ठेवला. सुमारे दहा मिनिटे हा प्रकार ये-जा करणारे नागरिक पहात होते मात्र तरीही कोणीही त्यांच्या मदतीला धावले नाही. मात्र रिक्षाचालक कलीम शेख यांनी प्रसंगावधान राखून डॉक्टर अहमद यांना रिक्षात टाकले आणि रुग्णालय गाठले.

दरम्यान रुग्णालयातील वैद्यकीय प्रमुख डॉ. मिनाज पटेल, नर्सिंग सुप्रीटेंडन्ट हर्षल पाटील यांच्यासह सहकाऱ्यांनी तात्काळ शस्त्रक्रिया करून रक्तस्त्राव रोखला. डॉ. अहमद यांच्या गळ्याच्या आतील भागात एक आणि गळ्यावर ११ टाके टाकण्यात आले. डॉ. अहमद यांचा मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता, तसेच त्यांच्या हृदयाचे ठोके देखील कमी पडू लागले होते. वेळीच उपचार मिळाले नसते तर त्यांचा जीव गेला असता असे डॉ. मिनाज पटेल यांनी सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!