Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Tokyo Olympic : कुस्तीपटू रवीकुमार दहिया रौप्य पदकाचा मानकरी

Advertisements
Advertisements
Spread the love

टोकियो : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचा कुस्तीपटू रवीकुमार दहिया याने रौप्यपदक जिंकून इतिहास घडवला. टोकियो ऑलिम्पिकमधील भारताचे हे दुसरे रौप्यपदक आहे. याआधी भारताला मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य, पीव्ही सिंधूने बॅडमिंटनमध्ये कांस्य, बॅक्सिंगमध्ये लव्हलिना बोर्गोहाने हिने कांस्य पदक जिंकून दिले होते. तर आज सकाळी भारताच्या पुरुष हॉकी संघाने कांस्यपदक जिंकले होते.

Advertisements

दरम्यान कुस्तीत फ्रीस्टाइलमध्ये ५७ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत रशियाच्या झावूर युगूएवने भारताच्या रवी कुमारचा पराभव केला. पहिल्या फेरीनंतर रवी कुमार ४-२ असा पिछाडीवर होता. झावूरने प्रत्येकी एक असे दोन गुण मिळवले. त्यानंतर रवीने दोन गुण मिळून बरोबरी केली. तर झावूरने पुन्हा दोन गुणांची कमाई केली. त्यानंतर झावूरने आणखी ३ गुण मिळवत आघाडी ७-२ अशी केली. अखेर झावूने रवी कुमारवर ७-४ असा विजय मिळवला. त्याआधी उपांत्य फेरीत रवीने कझाकिस्तानच्या नूरीस्लाम सनायेवचा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती.

Advertisements
Advertisements

ऑलिम्पिकमध्ये कुस्तीच्या अंतिम फेरीत जाणारा रवी हा दुसरा भारतीय होता. याआधी २०१२ मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये सुशीलकुमारने अंतिम फेरीत धडक मारली होती.

ऑलिम्पिकच्या कुस्तीच्या इतिहासात भारताने आतापर्यंत पाच पदक जिंकली होती. यामध्ये खाशाबा जाधव यांनी १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये कांस्य, सुशीलकुमारने २००८च्या बिजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य तर २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले होते. योगेश्वर दत्तने लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकले. तर २०१६ रिओ मध्ये साक्षी मलिकने कांस्य पदक जिंकले होते. या यादीत आता रवी कुमारचा देखील समावेश झाला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!