Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : पंतप्रधान मोदी यांच्यासह अनेकांच्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आज ६१ वा वाढदिवस आहे. राज्यात सध्या अनेक संकटांची मालिकाच सुरू असल्याने , मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी माझा वाढदिवस साजरा करू नका असे आवाहन आपल्या समर्थकांना केलं आहे. मात्र सोशल नेटवर्किंगवरुन अनेक मान्यवर उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देत आहेत. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते भारतीय संघातील मराठमोळा फलंदाज अजिंक्य रहाणेपर्यंत अनेकांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Advertisements

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आठवणीने आपल्या ट्विटद्वारे उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुम्हाला निरोगी दीर्घायुष्य मिळो अशी प्रार्थना करतो,” असे मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Advertisements
Advertisements

दरम्यान “वाढदिवसानिमित्त कुणीही अभीष्टचिंतन करण्यासाठी प्रत्यक्ष भेटू नये, तसेच फलक, पोस्टर्स लावू नये, सोशल मीडिया व ईमेलच्या माध्यमातून आपण शुभेच्छा स्वीकारू.” असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. “राज्यात अद्याप करोनाचे संकट कायम आहे, संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केली आहे, म्हणून आरोग्याचे नियम कटाक्षाने पाळत राहणे गरजेचे आहे. त्यामुळे वाढदिवसाचे कुठलेही जाहीर कार्यक्रम करू नयेत.”, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!