Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय अधिवेशनाची तयारी पूर्ण

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई :  राज्याच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या ५ आणि ६ जुलै रोजी होत आहे. या अधिवेशनात गेल्या वर्षीपासून रखडलेली विधानसभा अध्यक्षाची निवडणूक होणार आहे. ६ जुलै रोजी विधानसभा अध्यक्षाची निवडणूक होत असल्याचे वृत्त आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून संग्राम थोपटे यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते.

Advertisements

दरम्यान उद्या म्हणजेच ४ जुलैला विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. तर ५ जुलैला उमेदवारी अर्ज भरणे, अर्जाची छाननी आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ देण्यात येणार  आहे. यावेळी ऑनलाईन पद्धतीने मतदार असलेल्या आमदारांना निवडणुकीत सहभागी होण्याचा पर्याय देखील उपलब्ध असणार आहे.

Advertisements
Advertisements

या पावसाळी अधिवेशनासाठी मुंबईतील विधानभवानात पूर्व तयारी सुरू झाली आहे. अधिवेशनासाठी उपस्थित रहाणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस सुरक्षा रक्षक आणि पत्रकार या सर्वांना आरटीपीसीआरचाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. याच आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी आज आणि उद्या विधान भवनाच्या प्रांगणात राज्य सरकारकडून आयोजन करण्यात आलं आहे. कोरोना  संसर्गाची दुसरी लाट सध्या नियंत्रणात असली तरी पावसाळी अधिवेशन कडक निर्बंधांसह येत्या ५ आणि ६ जुलै रोजी होत आहे.

भाजपच्या आमदारांची बैठक

विधी मंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी भाजपच्या सर्व आमदारांची वसंत स्मृती येथे बैठक बोलावली आहे. या बैठकीला भाजपच्या सर्व १०५ आमदारांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेत. भाजपच्या वसंत स्मृती या दादरच्या कार्यालयात संध्याकाळी ही बैठक पार पडणार आहे. दोन दिवसाच्या अधिवेशनाची रणनीती ठरवण्यासाठी बैठक बोलावण्यात आली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!