Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : शाब्बास केरळ सरकार !! रेमडेसिवीरच्या इंजेक्शनचे 1 लाख डोस केंद्राला परत करणारे आदर्श राज्य !!

Advertisements
Advertisements
Spread the love

नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यात लसींचा तुटवडा , ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनवरून आरोप प्रत्यारोप चालू असताना कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी केरळ सरकारकडून केले जाणारे प्रयत्न स्तुत्य असल्याची प्रचिती येत आहे. विशेष म्हणजे केरळ सरकारने केंद्र सरकारकडे न वापरलेले रेमडेसिवीरच्या इंजेक्शनचे 1 लाख डोस परत केले आहेत. सरकारी सूत्रांनी बुधवारी ही माहिती दिली. केरळ सरकारने रेमेडिसवीरचे डोस केंद्राकडे परत केले आहेत, जेणेकरून हे औषध आवश्यक असलेल्या राज्यांमध्ये पुन्हा वाटप करता येतील. महत्त्वाचे म्हणजे केरळ सरकारने रेमडेसिवीर औषध अशा काळात परत करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यावेळी इतर राज्यांमध्ये या औषधासाठी अनोगोंदी निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Advertisements

दरम्यान गेल्या आठवड्यातच रेमडेसिवीर औषधाची पुरेशी उपलब्धता व्हावी, यासाठी केंद्र सरकारने 16 मेपर्यंत सर्व राज्यांना या औषधाचे वाटप करण्याचा निर्णय घेतला होता. केंद्रीय रसायन व खते मंत्री सदानंद गौडा यांनी हा निर्णय घेतला व औषध विभाग आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने संयुक्तपणे राज्यांमध्ये औषध वाटप करण्याची योजना तयार केली. केंद्रीय रसायन व खते मंत्रालयाने 21 एप्रिल ते 16 मे दरम्यान राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना 53 दशलक्ष रेमडेसिवीरचे डोस देण्याचे ठरवले आहेत. या औषधाचा कोरोना उपचारात फायदा होत असून ते कोरोनावर प्रभावी ठरत आहे. पुरवठा योजनेनुसार सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशांना वेळेवर पुरवठा करावा यासाठी कंपन्यांना सूचना देण्यात आल्या आहेत, जेणेकरुन कोणत्याही रुग्णाला या साथीच्या रोगाचा त्रास होऊ नये, असे गौडा म्हणाले.

Advertisements
Advertisements

केंद्रीय रसायन व खते मंत्रालयाने सांगितले की, औषधे पुरवण्याच्या योजनेनुसार जायडस कॅडिला 21 एप्रिलपासून 16 मेपर्यंत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये रेमडेसिवीरचे एकूण 9,82,100 डोस दिले आणि हेटेरो 17,17,050 लसींची पूर्तता करणार आहे. या दरम्यान मायलान कंपनी 7,28,000 डोस आणि सिप्ला 7,32,300 डोस पुरवणार आहेत. परिपत्रकात असेही सांगण्यात आले आहे की, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये जुबिलेंट कंपनी 4,45,700 डोस आणि सिंजेन/सन 3,73,000 डोस तर डॉ. रेड्डीज कंपनी 3,21,850 डोस पुरवणार आहेत. त्यामुळे आता या औषधाची कमतरता भासणार नाही.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!