Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : डोळा मारून फ्लाईंग किस केला आणि तो एक वर्षासाठी तुरुंगात गेला …

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई : मुंबईच्या एका २० वर्षीय  युवकाने  अल्पवयीन मुलीला डोळा मारून फ्लाईंग किस केल्याच्या आरोपावरून  १ वर्षाची शिक्षा सुनावली आहे.  प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्सुअल ऑफेसेंस कायद्यातंर्गत न्यायालयाने आरोपी तरुणाला हि शिक्षा सुनावली.

Advertisements

पीडित मुलीच्या वतीने तिच्या आईने एलटी मार्ग पोलीस स्टेशनमध्ये या बाबत दिलेल्या तक्रारीत म्हटले होते कि , दि .  २९ फेब्रुवारी २०२० रोजी त्यांच्या १४ वर्षाच्या मुलीला एका मुलाने डोळा मारला आणि फ्लाईंग किस केला. यावरून पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी युवकांविरुद्ध लैंगिक छळ केल्याची तक्रार नोंदवून  तात्काळ कारवाई करत त्याला अटक केली. तेव्हापासून ही तरूण पोलीस कोठडीत आहे.

Advertisements
Advertisements

दरम्यान या तरूणाने न्यायालयात  दावा केला की, मुलीच्या आईने मी वेगळ्या जातीचा असल्याने मुलीशी बोलण्यापासून रोखले  होते . तसेच तिच्या नातेवाईकांमध्ये तिने मला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याबाबत चॅलेंज केले होते परंतु  सुनावणीवेळी मुलगी, तिची आई आणि तपास अधिकारी यांची साक्ष ग्राह्य धरून गुन्हा सिद्ध करण्यात आला.

न्यायालयात साक्षीदारांच्या जबाबानंतर तरूण दोषी आढळला. त्यावेळी न्यायालयाने  सांगितले की, आरोपीच्या विरोधात लैंगिक छळाचा गुन्हा सिद्ध झाला आहे. त्यामुळे त्याला १ वर्षाची शिक्षा सुनावण्यात येत आहे. तक्रारीनुसार डोळा मारणे आणि फ्लाईंग किस करणे हा लैंगिक इशारा आहे. त्यामुळे पीडित तरूणीचा लैंगिक छळ झाला आहे असे  न्यायालयाने  सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!