Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

NagpurCoronaUpdate : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत कोरोनाबाधित

Advertisements
Advertisements
Spread the love

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे वृत्त आहे. त्यांची आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. शुक्रवारी त्यांना सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवल्यामुळे लगेच त्यांची चाचणी करण्यात आली. त्यांची प्रकृती स्थिर असून खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना नागपूरच्या किंग्जवे हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले आहे .

Advertisements

दरम्यान भागवत यांना करोना झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट केले आहे. ”राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूजनीय डॉ. मोहनजी भागवत हे करोना पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त आहे.  लवकरात लवकर त्यांना बरे वाटावे, अशी देवाकडे प्रार्थना करतो”, असे ट्विट गडकरींनी केले आहे.

Advertisements
Advertisements

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!