Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात , उद्या शस्त्रक्रिया

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवार यांना पुन्हा  मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोटात दुखू लागल्यामुळे  रविवारी ते रुग्णालयात  गेले होते.  प्राथमिक तपासणीनंतर त्यांना 31 मार्चला रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यानुसार शरद पवार यांच्यावर 31 मार्च म्हणजेच बुधवारी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

Advertisements

शरद पवार यांना पोट दुखीचा त्रास होत असल्यामुळे दोन दिवसांपूर्वी तपासणी करण्यात आली होती. बुधवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. परंतु, प्रकृती बिघडल्यामुळे शरद पवार यांना तातडीने मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. शरद पवार यांना Gallstone म्हणजे पित्ताशयात खडे झाले आहेत. त्यांच्यावर बुधवारी 31 मार्च रोजी शस्त्रक्रिया केली जाणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!