Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharshtraNewsUpdate : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई  :  राष्ट्रवादी काँग्रेसचेअध्यक्ष शरद पवार यांना त्रास जाणवून लागल्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये आज सकाळी  तपासणीसाठी आले होते. पित्ताशयाचा त्रास होत असल्यामुळे बुधवारी 31 मार्चला त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे, अशी माहिती मिळत आहे.  डॉक्टरांनी शरद पवार यांची तपासणी केली आहे.

Advertisements

दरम्यान प्रकृतिअस्वास्थामुळे  शरद पवार यांचे  पुढील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत . त्यांना पश्चिम बंगाललाही प्रचाराला जाता येणार नाही. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी ममता बॅनर्जी यांच्या प्रचारासाठी शरद पवार जाणार होते. पण आता प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांना दौरा रद्द करावा लागला आहे.

Advertisements
Advertisements

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. शरद पवार यांना पोटात दुखू लागल्यामुळे रुग्णालयात तपासणी करण्यासाठी आले होते. पण, पित्ताशयाचा त्रास अधिक जाणवू लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 31 मार्च रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. त्यानंतर पुढील 2 आठवडे ते घरीच विश्रांती करणार आहे, या काळात त्यांचे सर्व दौरे रद्द करण्यात आले असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

नवाब मलिक यांचे ट्विट 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे कि , काल रात्री पवार यांना अस्वस्थ वाटू लागल्याने तपासणीसाठी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीनंतर त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं निदान झालं. पित्ताशयावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. दोन दिवस औषधे बंद करण्यात आली आहे. शिवाय ३१ मार्चला अँडोस्कोपी झाल्यानंतर शस्त्रक्रिया केली जाईल.

पश्चिम बंगाल निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जाणार होते. पण प्रकृती अस्वस्थेमुळं शरद पवारांना रुग्णालयात दाखल व्हावे लागल्याने त्यांचे सर्व नियोजित दौरे रद्द करण्यात आले आहेत. तर लवकरच त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!