#News Updates : सकाळच्या टॉप १० बातम्या …कोण आहेत दोन गुजराती चोर देशाला मूर्ख बनवताहेत !! कोण ? कोणाला म्हणाले ?

१. काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांचा २७ आणि २८ मार्चला अमेठी आणि रायबरेलीचा दौरा, २९ मार्च रोजी अयोध्येत जाणार
२. ऑगस्टा वेस्टलँड प्रकरण: मध्यस्थी सुशेन मोहन गुप्ता याला काल रात्री अटक, ईडीची कारवाई, दिल्लीच्या पतियाळा हाऊस कोर्टात आज हजर करणार
३. लोकसभा निवडणूक: पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, अरुण जेटली, सुषमा स्वराज, उमा भारती आदींसह अन्य नेते उत्तर प्रदेशात करणार प्रचार, ४० स्टार प्रचारकांच्या यादीत लालकृष्ण अडवानी, मुरली मनोहर जोशींच्या नावाचा समावेश नाही…. लोकसभा निवडणूक: उत्तर प्रदेशसाठी भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर
४. छत्तीसगड: सुकमामधील बिमापुरममध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक…चार नक्षलवादी ठार, शस्त्रे केली जप्त
५. बालाकोटमध्ये जर खरोखरच ३०० जण ठार झाले असतील तर आंतरराष्ट्रीय पटलावर त्या मृतांसाठी कोणीही आवाज का उठवत नाही? बालाकोटबद्दल जो कोणी प्रश्न उपस्थित करतो त्याला राष्ट्रविरोधी किंवा पाकिस्तानी का म्हटलं जातंय? : फारुक अब्दुल्ला
६. कांग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज राजस्थान दौऱ्यावर, कार्यकर्त्यांना संबोधित करणार
७. वंचितांची आघाडी म्हणजे निवडणुकीपुरत्या उगवलेल्या छत्र्या : उद्धव ठाकरे
८. जेएनयूत विद्यार्थ्यांचा गोंधळ, पत्नीला घरात कैद केल्याचा कुलगुरूंचा आरोप
९. दोन गुजराती चोर देशाला मूर्ख बनवताहेत; नेतृत्त्वावर टीका केल्यानं भाजपा नेत्याची हकालपट्टी
१०. अनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या