तोरंगणा घाटात बस दरीत कोसळली; ६ ठार ४५ जखमी

Advertisements
Advertisements
Spread the love

मोखाडा-त्र्यंबकेश्वर मार्गावरील तोरंगणा घाटात खासगी बस २५ फूट खोल दरीत कोसळली आहे. यामध्ये ६ प्रवासी ठार झाले असून ४५ जण जखमी झाले आहेत. जखमींना त्र्यंबकेश्वर येथील सरकारी रुग्णालयात हलविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.  पोलिस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. ही खासगी बस मोखाडा-त्र्यंबकेश्वर मार्गावरून पालघरला येत होती. यावेळी दुपारी पावणेतीनच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस २५ फूट खोल दरीत कोसळली. यामध्ये ६ जण ठार झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असून ४५ जण जखमी झाले आहेत. अपघातस्थळी पोलीसांचे पथक पोहोचले असून बस दरीतून वर काढण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!