Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

उच्चशिक्षीत तरूणाची आत्महत्या

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंंगाबाद : अभियंता असलेल्या उच्चशिक्षीत आकाश दत्तराव अडकीने (वय २२, रा.नांदेड, ह.मु.अगसेन भवनजवळ, सिडको परिसर) याने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि.२२) सकाळी सव्वादहा वाजेच्या सुमारास घडली. आकाश अडकीने याने गळफास घेतला असल्याचा प्रकार लक्षात आल्यावर त्याच्या नातेवाईकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. सिडको पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून आकाश अडकीने याला बेशुध्दावस्थेत उपचारासाठी घाटीत दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून आकाश अडकीने याने आत्महत्या का केली याचे कारण समजू न शकल्याचे पोलिसांनी सांगितले.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!