Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

सोशल मिडियावर महिलेची बदनामी, ७ जणांविरूध्द गुन्हा दाखल

Spread the love

औरंंगाबाद : सोशल मिडिया साईटवर बनावट प्रोफाईल तयार करून त्यावर तक्रारदार महिला व तिच्या बहिणीला अश्लिल एसएमएस आणि व्हीडीओ क्लिप पाठवून बदनामी करणाऱ्या बनावट ७ प्रोफाईल धारकाविरूध्द सिटीचौक पोलिस ठाण्यात बदनामी करून विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला व तिच्या बहिणीची सोशल मिडियावर बदनामी करण्यात आल्याचा प्रकार २ डिसेंबर २०२० ते १७ जानेवारी २०२१ या काळात घडला. बनावट प्रोफाईल तयार करणाऱ्यांनी पीडित महिला व तिच्या सोशल मिडियावर खात्यावर देखील अश्लील व्हीडीओ क्लिप आणि फोटो टाकले असल्याचे पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!