रेकाॅर्डवरचा गुन्हेगार तथा भाजपायुवा मोर्चा शहर उपाध्यक्षावर प्राणघातक हल्ला,आरोपी फरार 

Advertisements
Advertisements
Spread the love

लग्न समारंभ आटोपल्यावर भावाच्या सास-याला सोडण्यासाठी जात असलेल्या बंटी राजू चावरिया रा. गांधीनगर औंगाबाद या रेकाॅर्डवरच्या गुन्हेगाराला रस्त्यात अडवून रेकाॅर्डवरच्या गुन्हेगारानेच प्राणघातक हल्ला केल्याची घटना गुरुवारी रात्री साडेदहा ते पावणे अकराच्या सुमारास रेल्वे स्टेशन रोडवरील तिवारी मंगल कार्यालयाजवळ घडली. याप्रकरणी शुक्रवारी दुपारी अडीच वा.वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Advertisements

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप युवा शहर उपाध्यक्ष बंटी चावरीया याच्यावर २०१५साली क्रांतीचौक पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न करणे तसेच इतर अनेक गुन्हे दाखल आहेत. बंटी लग्न समारंभासाठी तिवारी मंगल कार्यालयात गेले होते. समारंभ आटोपल्यावर भावाच्या सास-याला दुचाकीवर सोडण्यासाठी जात असताना समोरून आलेल्या मनीष लाहोट रा. छोटामुरलीधर नगर व चार ते पाच जणांनी बंटी यांच्यावर शस्त्राने प्राणघातक हल्ला चढवला. या हल्ल्यानंतर हल्लेखोर पसार झाले. दरम्यान, बंटी यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक रामेश्वर रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय प्रमोद देवकाते करंत आहेत.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!