Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Filmfare Awards 2019: हेमामालिनी आणि श्रीदेवी यांना जीवनगौरव, आलिया आणि रणबीर या जोडीने पटकावला फिल्मफेअर !!

Advertisements
Advertisements
Spread the love


बांद्रा येथील जिओ गार्डनमध्ये झालेल्या  ‘६४ व्य  विमल इलायची फिल्मफेअर पुरस्कार २०१९’ सोहळ्यात  बॉलिवूडची सध्याची चर्चेतली जोडी रणबीर कपूर व आलिया भट्ट यांनी यंदाचा “फिल्मफेअर”  पटकावला . रणबीरला संजू चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा तर, आलियाला ‘राजी’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

Advertisements

मनोरंजन सृष्टीतील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी फिल्मफेअरने ड्रिमगर्ल हेमा मालिनी यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले. यावेळी मनोगत व्यक्त करताना हेमा मालिनी म्हणाल्या, ‘ हा प्रवास माझ्या सहकलाकारांच्या योगदानाशिवाय अपुरा आहे. मला फिल्मफेअरकडून मिळालेला हा सन्मान खूप महत्त्वाचा आहे. माझ्या अभिनयाच्या आवडीबरोबर नृत्याची आवडही मी जपली. त्यामुळे नृत्य आणि अभिनय हे दोन्ही माझ्यासाठी हृदयाच्या खूप जवळ आहेत.’

Advertisements
Advertisements

ज्येष्ठ कवी, गीतकार, चित्रकर्मी गुलजार यांच्या हस्ते हा पुरस्कार हेमामालिनी यांना प्रदान करण्यात आला. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांनाही त्यांच्या अविस्मरणीय योगदानासाठी फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. हा पुरस्कार बोनी कपूर यांनी दिग्दर्शक करण जोहर यांच्या हस्ते स्वीकारला.

या सोहळ्यात  शाहरुख खान, विकी कौशल, क्रिती सॅसोन, रणवीर सिंह यांनी आपल्या धमाकेदार नृत्यांनी रसिकांची माने जिंकली . प्रसिद्ध अभिनेते शाहरुख खान यांनी या दिमाखदार सोहळ्याचे सूत्रसंचालन केले.   संजय लीला भन्साळी, श्रेयस तळपदे, मनीष मल्होत्रा, जान्हवी कपूर, अमृता खानविलकर, राही बर्वे, भुवन बाम, चित्रांगना सिंह, विकी कौशल, करण जोहर, गणेश आचार्य, सई ताम्हणकर, आशा भट, पूजा सावंत, इशान खट्टर, मनीष पॉल, अंकिता लोखंडे, मधुर भांडारकर, बोनी कपूर, दिया मिर्झा, आयुषमान खुराना, समीरा रेड्डी, सारा अली खान, हेमा मालिनी, मेघना गुलजार, सिद्धार्थ जाधव, अर्जुन कपूर, सयमी खेर, सोनम कपूर, आलिया भट, शरद केळकर, सनी लिओनी, कटरीना कैफ यांच्यासह सिने क्षेत्रातील अनेक दिग्गज यासोहळ्याला उपस्थि होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!