Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraCoronaUpdate : राज्यात ३७१७ नवे रुग्ण , ३०८३ रुग्णांना डिस्चार्ज , ७० रुग्णांचा मृत्यू

Advertisements
Advertisements
Spread the love

राज्यात कोरोनामुक्त  होणाऱ्यांमध्ये रविवारी थोडी घट बघायला मिळाली. तर  दिवसभरात 3 हजार 83 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे कोरोनामुक्त होणाऱ्यांचं प्रमाण 93.44 टक्के एवढं असून एकूण संख्या ही 17 लाख 57 हजार एवढी झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 3 हजार 717 नवे रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ही 18 लाख 80 हजार 416 एवढी झाली आहे. दिवसभरात 70 रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यू दर हा 2.56 वर गेला आहे.

Advertisements

राज्यात आजपर्यंत 1 कोटी 17 लाख 2 हजार 457 एवढ्या चाचण्या घेण्यात आल्या असून 16.07 टक्के जणांचे निकाल हे पॉझेटिव्ह आले आहेत. राज्यातल्या उपचाराधिन रुग्णांची संख्या घटली असून सध्या 74 हजार 104 जणांवर उपचार सुरू आहेत.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!