Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : भाजप अध्यक्ष  जेपी नड्डा यांना कोरोनाची बाधा

Advertisements
Advertisements
Spread the love

भाजप अध्यक्ष  जेपी नड्डा यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, कोरोनाची सुरुवातीची लक्षणे दिसत असल्याने मी तपासणी केली आणि तपासणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार होम आयसोलेशनच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे मी पालन करीत आहे. माझी प्रकृती ठीक आहे. माझी विनंती आहे की, गेल्या काही दिवसांत जे कोणी माझ्या संपर्कात आले असतील त्यांनी स्वत: आयसोलेट करावं व स्वत:ची चाचणी करुन घ्यावी.

Advertisements

गेल्या काही महिन्यांमध्ये राजकीय व्यक्तींपासून मनोरंजन आणि इतर क्षेत्रातील दिग्गजांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त वारंवार समोर येत आहे. काही महिन्यांपूर्वी गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाली होती. गेल्या काही दिवसात देशातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली असली तरी सर्वांनाच कोरोनाच्या लशीची प्रतीक्षा आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!