Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

लोकसभा २०१९ : काँग्रेसची सातवी यादी घोषित, औरंगाबाद सुभाष झांबड, जालना विलास औताडे

Advertisements
Advertisements
Spread the love

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आज मध्य रात्री उमेदवारांची सातवी यादी प्रसिद्ध केली आहे. सातव्या यादीत एकूण 35 उमेदवारांचा समावेश आहे. काँग्रेसकडून आज जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये  महाराष्ट्रातील एकूण पाच मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा झाली आहे. तसेच या यादीत छत्तीसगडमधील चार, जम्मू काश्मीरमधील तीन, ओदिशामधील दोन, तामिळनाडूमधील आठ, तेलंगाणामधील एक, त्रिपुरामधील दोन, उत्तर प्रदेशमधील नऊ आणि पुदुच्चेरीमधील एका उमेदवाराचा समावेश आहे.

Advertisements

काँग्रेसच्या आजच्या यादीमधून चंद्रपूर, जालना, औरंगाबाद, भिवंडी आणि लातूर येथील उमेदवारांची घोषणा करण्यात आली. चंद्रपूर येथून  विनायक बांगडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर जालन्यामधून विलास औताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचा सामना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी होईल. औरंगाबादमधून सुभाष झांबड यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. तर भिवंडीमधून माजी खासदार सुरेश टावरे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तसेच आरक्षित मतदारसंघ असलेल्या लातूर येथून मच्छिंद्रनाथ कामंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Advertisements
Advertisements

काँग्रेसने लोकसभा निवडणुकीची आपली सातवी यादी जाहीर केली असून यात ३५ उमेदवारांचा समावेश आहे. या यादी नुसार रेणुका चौधरी तेलंगणातील खम्मम, इम्रान प्रतापग्रही राज बब्बर यांना देण्यात आलेल्या उत्तर प्रदेशातील मुरादाबादहून, प्रीता हरित उत्तर प्रदेशातील आग्रा येथून तर राज बब्बर यांना उत्तर प्रदेशातील फतेहपूर सिक्रि येथे मतदार संघ बदलून उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान  काँग्रेस ने ओरिसा येथील विधानसभेच्या निवडणुकीसाठी ५४ उमेदवारांची यादीहि आज घोषित केली आहे .

आपलं सरकार

Click to listen highlighted text!