IndiaCrimeUpdate : धक्कादायक : नात्यात विवाह करण्यास विरोध , महिलेला मिळाली अशी क्रूर शिक्षा , ज्याची कुणी कल्पनाही करणार नाही !!

Advertisements
Advertisements
Spread the love

राजस्थानात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे . या घटनेत एका २८ वर्षीय विधवा महिलेने नातेवाईकासोबत पुनर्विवाहाला नकार दिला म्हणून सासरकडच्या मंडळींनी तिचं नाक आणि जीभ कापून टाकली. या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक केली असून सहआरोपींचा शोध सुरु आहे असे स्थानिक पोलीस अधिकारी कांता सिंह यांनी सांगितले. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

Advertisements

या बाबतची  अशी कि, जखमी महिलेचे सहावर्षांपूर्वी लग्न झाले होते. पण लग्नानंतर वर्षभरातच तिच्या पतीचे निधन झाले. त्यानंतर सासरकडची मंडळी तिचे एका नातेवाईकासोबत लग्न लावून देण्याचा प्रयत्न करत होते. “माझ्या बहिणीने लग्नाचा प्रस्ताव फेटाळून लावल्यानंतर सासरकडच्या मंडळींनी आमच्या घरी येऊन माझ्या बहिणीवर हल्ला केला. आरोपींनी माझ्या बहिणीचं नाक आणि जीभ कापली. तिच्या उजव्या हातालाही मार लागला. माझी आई हल्लेखोरांपासून तिला वाचवण्याचा प्रयत्न करत होती. त्यात ती सुद्ध जखमी झाली” असे महिलेच्या भावाने सांगितले. जखमी महिलेवर जोधपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!