Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : गोव्याला निघालेल्या प्रवाशांच्या बसला भीषण अपघात ६ ठार ७ जखमी

Advertisements
Advertisements
Spread the love

पुणे -बंगलोर महामार्गावर उंब्रज जवळील तारळी नदीजवळ  पहाटेच्या सुमारास  झालेल्या भीषण अपघातात ६  जण  जागीच ठार झाले .  हे सर्व जण दिवाळी सुट्टयानिमित्ताने गोव्याला फिरायला निघाले होते. मिळालेल्या माहितीनुसार ट्रॅव्हल्सनं गोव्याला जात असताना उंब्रज नदीजवळ ही गाडी अचानक कठडा सोडून ४० फूट खोल कोसळली. या अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. सात जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान या ठिकाणी अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली असून  पोलीस आणि स्थानिकांकडून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Advertisements

दिवाळीच्या पहिल्या दिवशी हे प्रवासी साताऱ्यात वाशीवरून गोव्याला निघाले होते मात्र पहाटेच्या सुमारास पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर उंब्रज गावच्या तारळी पुलाचा कठडा तोडून  ट्रॅव्हलर बस ४० फूट खोल खड्ड्यात कोसळली आणि हा अपघात झाला. अपघातातील मृतांमध्ये एक महिला आणि ३ वर्षांच्या बालकाचा समावेश आहे. घटनास्थळी स्थानिक नागरिक आणि उंब्रज पोलिस यांचे तातडीने मदत कार्य असून जखमींना उपचारासाठी सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!