IndiaNewsUpdate : दलितांवर अत्याचार होताहेत, मुलींना सुरक्षा नाही, गुन्हेगारांना पाठीशी घातले जातेय, हा कुठला राज धर्म : सोनिया गांघी

Now atrocities on Dalits have reached a new zenith. Instead of honouring law & granting protection to India's daughters, BJP govt is siding with criminals. Voice of oppressed families being suppressed. Is this the new 'Raj Dharma'?: Congress President Sonia Gandhi pic.twitter.com/bglsNy5Swz
— ANI (@ANI) October 18, 2020
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर आज पुन्हा टीका केली . देशातील दलितांवर अत्याचार होत आहेत. कायद्याचा सन्मान करण्या ऐवजी, मुलींना सुरक्षा देण्या ऐवजी भाजपा सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे. पीडित कुटुंबांचा आवाज दाबला जात आहे. हा कोणता राजधर्म आहे? असा प्रश्न काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना केला आहे.काँग्रेसचे नवनियुक्त सरचिटणीस आणि प्रभारी यांना मार्गदर्श करतेवेळी सोनिया गांधी यांनी विविध मुद्यांवरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. देशाची लोकशाही कठीण काळातून जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना सोनिया गांधी म्हणाल्या, देशातील लोकशाही सर्वात कठीण काळातून जात आहे. कोरोनाला हरवण्याचा दावा करणाऱ्या पंतप्रधानांनी देशाला आहे त्या परिस्थितीवर सोडले आहे. त्यांनी आपल्या उत्तरदायीत्वापासून तोंड फिरवले आहे. महामारीशी लढण्यासाठी यांच्याकडे धोरणही नाही व विचार नाही. देशासाठी सातत्याने संघर्ष करणे हेच काँग्रेसचे उद्दिष्ट राहिलेले आहे. देशाची सेवा करणे हाच आपल्या संघटनेचा मूलमंत्र आहे. असं देखील त्यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना सांगितलं. यावेळी त्यांनी मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी आणलेल्या तीन कृषी कायद्यांवरून देखील टीका केली. त्यांनी म्हटले की, ही विधेयकं शेतकऱ्यांच्या हिताची नाहीत व यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होईल. याचबरोबर अर्थव्यवस्थेच्या बिघडलेल्या स्थितीवरून देखील त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
देश के लिये लगातार संघर्ष करना ही कांग्रेस संगठन का लक्ष्य रहा है। देश की सेवा करना ही हमारे संगठन का मूल मंत्र है। आज देश का लोकतंत्र कठिन दौर से गुजर रहा है, देश में पीड़ित परिवारों की आवाज को दबाया जा रहा है।
कांग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी जी का वक्तव्य:- pic.twitter.com/Nllx5LtuGT
— Congress (@INCIndia) October 18, 2020