CrimeNewsUpdate : अरे रे !! हे काय घडले ? बारा वर्षीय भावाने लहान बहिणीच्या डोक्यात घातला हातोडा… !!

Advertisements
Advertisements
Spread the love

अहमद नगर शहरानजीक असणाऱ्या केडगाव मध्ये घडू नये तो प्रकार घडला . या घटनेत टीव्ही पाहण्यावरून भावा- बहिणीत वाद झाला आणि या वादातूनच भावाने रागाच्या भरात आपल्या नऊ वर्षीय बहिणीच्या डोक्यात हातोडा घातल्याने तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी संबंधित अल्पवयीन मुलाला पोलिसांनी  केडगाव बायपास येथील हॉटेल वरून ताब्यात घेतले असून पुढील तपास चालू  आहे. घटना घडली तेंव्हा आई-वडील घरात नव्हते . दरम्यान टीव्ही पाहण्यावरून बारा वर्षीय भाऊ व नऊ वर्षीय बहिणीमध्ये वाद झाला. यावेळी संतप्त भावाने त्याच्या बहिणीच्या डोक्यात हातोडा घातला. त्यामध्ये बहिण गंभीर जखमी झाली. त्यानंतर तिला तसेच जखमी अवस्थेत सोडून त्याने  घरामधील लॅपटॉप व पैसे घेऊन केडगाव बायपास येथील एक हॉटेल गाठले आणि मला घरच्यांनी मारहाण केली असून तुमच्या हॉटेलमध्ये नोकरी द्या, असे हॉटेलच्या व्यवस्थापकाला सांगितले. त्यावेळी हॉटेलच्या व्यवस्थापकाने मुलाच्या पालकांना फोन केला. त्यानंतर मुलाचे पालक तातडीने घरी पोहचले असता त्यांना त्यांची मुलगी बाथरूम मध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. तसेच या मुलीचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

Advertisements

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!