MumbaiNewsUpdate : भयानकच !! ड्रग्जचे व्यसन असलेल्या या नातवाने आपल्या आजीसोबत हे काय केले ?

Advertisements
Advertisements
Spread the love

ड्रग्जचे व्यसन असलेल्या एका नातवाने आपल्या आजीची निर्घृण हत्या केली आहे. या निर्दयी नातवाने आपल्या आजीचे शीर कापून घरातील डायनिंग टेबलवर ठेवले. एवढ्यावरच तो थांबला नाही. त्याने आजीचे इतर अवयवय कापून घरात इतरत्र फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अतिव्यसनाधीन असलेल्या या नातावाचे मानिसक संतुलन बिघडलेले असल्याची देखील माहिती समोर येत आहे. मुंबईतील वांद्रे परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे.

Advertisements

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ख्रिस्तोफर डायस (वय-२५)असे आजीची निर्घृण हत्या करणाऱ्या नातावचे नाव आहे. तो रोझी डायस या त्याच्या आजी समवेत राहत होता. सोमवारी रात्री आजी झोपलेली असताना, त्याने तिचा गळा चिरून हत्या केली. यानंतर आजीचे शिर कापून घरातील डायनिंग टेबलवर ठेवले व शरीराचे अन्य अवयवय कापून घरात इतरत्र फेकले. ख्रिस्तोफरला ड्रग्जचे व्यसन जडलेले असल्याने, त्याला या अगोदर नशामुक्ती केंद्रातही पाठवण्यात आले होते. त्या ठिकाणी जवळपास दीड वर्षे राहिल्यानंतर तो घरी परतला होता. आजीची हत्या केल्यानंतर त्याने याबाबत गोव्यात असलेल्या आपल्या वडिलांना फोन करून कळवले. त्यानंतर त्याचे वडिल मुंबईत आल्यावर घडलेला प्रकार पाहून त्यांना धक्का बसला. आपण आजीचा खून केला असल्याचे त्यांने वडिलांना अगदी हसत हसत सांगितले. यानंतर त्याला अटक करण्यात आली व गुन्हा नोंदवण्यात आला. न्यायालयाने त्याला पोलीस कोठवडी सुनावली आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!