Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : सुसाट कंटेनरच्या टायर चिरडून एक ठार ; एक गंभीर , गोलवाडी फाट्यावरील घटना.

Advertisements
Advertisements
Spread the love

नातेवाईकाला भेटून घरी शहरात येत असताना सुसाट वेगातील मालवाहू कंटेनरने मोपेडला धडक देत दुचाकीस्वारला चिरडले या अपघातात पाठीमागे बसलेला एक जण गंभीरपणे जखमी झाला ही घटना शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास औरंगाबाद- अहेमदनगर महामार्गावरील गोलवाडी फाटा येथे घडली.
खंडू उत्तम गवळे, वय-30 वर्षे (रा.गांधीनगर,औरंगाबाद) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.तर संदीप जगन्नाथ कांबळे वय-32 (रा.वडगाव कोल्हाटी) असे जखमींचे नाव आहे.

Advertisements

या अपघात प्रकरणी अधिक माहिती अशी की, खंडू हा शहरातील एका वीट पुरवठादार कडे कामाला होता. शुक्रवारी दुपारी तो गोलवाडी येथील नातेवाईकांच्या घरी गेला होता.रात्री जेवण केल्यानंतर तो त्याची दुचाकी (एम.एच.20 एफडी 3385) ने मित्र संदीप सोबत तेथून औरंगाबादकडे घरी येण्यासाठी निघाला होता.औरंगाबाद-अहेमदनगर रस्त्यावरील गोलवाडी फाटा येते येताच सुसाट वेगात असलेल्या एका मालवाहू कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.दरम्यान खंडू हा कंटेनर च्या टायर खाली आला.टायर कामरेवरून गेल्याने तो जागेवरच गतप्राण झाला.तर पाठीमागे बसलेला मित्र संदीपहा बाजूला फेकला गेल्याने तो गंभीरपणे जखमी झाला.अपघात झाल्याने पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने दोघांनाही घाटीत दाखल केले.जखमी संदीपवर रुग्णालयात उपचार सुरू असून या अपघात प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे.पोलिसांची दुपारपर्यंत कायदेशीर प्रक्रिया सुरू होती.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!