Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharshtraUpdate : जाणून घ्या राज्यातील कोरोनाबाधितांची ताजी स्थिती

Advertisements
Advertisements
Spread the love

गेल्या २४ तासात राज्यात  दिवसभरात २३ हजार ३६५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे  राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णसंख्या ११ लाख २१ हजार २२१ इतकी झाली आहे. तर दिवसभरात ४७४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून मृतांची संख्या ३० हजार ८८३ इतकी झाली आहे. आरोग्य विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे. राज्यातील कोरोनाचा  मृत्यूदर सध्या २.७५ टक्के इतका आहे. दरम्यान आज दिवसभरात १७ हजार ५५९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात असून आतापर्यंत ७ लाख ९२ हजार ८३२ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट ७०.७१ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर मृत्यूदर २.७५ टक्के इतका आहे. आतापर्यंत ५५ लाख ६ हजार २७६ चाचण्या करण्यात आल्या असून यामधील ११ लाख २१ हजार २२१ रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.राज्यात सध्या १७ लाख ५३ हजार ३४७ लोक होम क्वारंटाइन असून ३६ हजार ४६२ जण संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!