Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

राजगृह तोडफोड प्रकरण , एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई स्थित दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवास स्थानी दि. ७ जुलैला हल्ला करणाऱ्या एका  आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. संशयित म्हणून ताब्यात घेतलेला आरोपी परेल टीटी भागात राहणारा आहे.  अधिक तपास केला असता सीसीटिव्ही आणि साक्षीदारांचे जबाब घेतल्यानंतर संशयीत आरोपीसोबत आणखी एक मुख्य आरोपी  असल्याचे निदर्शनास आले आहे. आज दुपारी पोलिसांनी अटक केलेल्या तरुणाचे नाव उमेश जाधव तो  प्रेस भागात राहणारा आहे. तो बिगारी काम करतो अशी माहिती समोर आली आहे.

Advertisements

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, त्याने हे कृत्य का केलं याबाबत पोलिसांनी अजून खुलासा केला नाही.  दरम्यान, ‘राजगृह’वर अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली होती. राजगृह परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड झाली होती. एवढंच नाही तर माथेफिरूंनी घराच्या काचांवरही दगडफेक केली  असून कुंड्यांचेही मोठे नुकसान झाले होते.  या सर्व घटनेचे सीसीटीव्ही फूटेज आंबेडकर कुटुंबियांकडून पोलिसांना देण्यात आले.

Advertisements
Advertisements

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यसह अनेक मान्यवरांनी या घटनेची निंदा केली होती.  ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समजाचे श्रद्धास्थान आहे. आपला ग्रंथ खजिना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या वास्तुत जपून ठेवला. महाराष्ट्रातील तमाम जनतेचे हे तीर्थक्षेत्रच आहे. राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही. कडक कारवाईचे आदेश मी पोलिसांना दिले आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!