शरद पवारांना युतीच्या फुसक्या वाऱ्याची भीती नाही, आम्ही जिंकू आणि तुम्हाला पेढे पाठवू : धनंजय मुंडे

Advertisements
Advertisements
Spread the love

राजकीय वादळाला हवं तसं वळवण्याची ताकद, झेलण्याची आणि पतवून लावण्याची ताकद धमक शरद पवारांमध्ये आहे. सलग १४ निवडणुका जिंकणाऱ्या शरद पवारांना युतीच्या फुसक्या वाऱ्याची भीती नाही, शरद पवार जरी निवडणूक लढवणार नसले तरीही माढाची जागा राष्ट्रवादीच जिंकेल. विजयाचा पेढा तुम्हाला वर्षावर घरपोच पाठवू असे प्रत्युत्तर धनंजय मुंडे यांनी दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांनी माघार घेतल्यावर जी टीका केली त्याला धनंजय मुंडे यांनी उत्तर दिलं आहे. आम्ही माढाही जिंकू आणि उर्वरीत महाराष्ट्रही जिंकू, विजयाचा पेढा वर्षा या तुमच्या निवासस्थानी येऊन भरवू अशीही टीका धनंजय मुंडे यांनी केली. माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक न लढवण्याचा निर्णय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज जाहीर केला. त्यानंतर शरद पवारांची माघार म्हणजे युतीचा पहिला मोठा विजय आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. याच टीकेला आता धनंजय मुंडे यांनी उत्तर दिले आहे.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!