CoronaNewsUpdate देश : गेल्या २४ तासात १८५५२ रुग्णांची वाढ , कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा ५ लाख ८ हजारावर

Advertisements
Advertisements
Spread the love

देशभरात कोरोनाचे 24 तासांत तब्बल 18 हजार 552 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा 5 लाख 8 हजार 953 वर पोहोचला आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात 1,97,387 एक्टिव केसेस आहेत तर 2,95,880 लोकांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केल्यानं त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान कोरोनामुळे देशात 24 तासांत 384 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचा आकडा 15,685 वर पोहोचला आहे.

Advertisements

आरोग्य खात्याच्या आकडेवारीनुसार देशात 24 तासांत सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्र, तमिळनाडूमध्ये आढळले आहेत. महाराष्ट्रात 5024, तमिलनाडूमध्ये 3645, दिल्लीत 3460, तेलंगाना इथे 985 तर उत्तर प्रदेशात 750 नवीन रुग्ण आढळले आहेत. 24 तासांतील ही धक्कादायक आकडेवारी असल्यानं चिंता व्यक्त केला जात आहे. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रातील मृत्यूचा आकाडा हा 175 तर दिल्लीतला 63 आहे. तमिळनाडूमध्ये 46 तर उत्तर प्रदेशात 19 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र, दिल्ली, तमिळनाडूमधील कोरोनाची स्थिती चिंताजनक आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!