Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

लोकसभा २०१९ : मोदींच्या निरोप समारंभाचा पहिला दिवस : काँग्रेस

Advertisements
Advertisements
Spread the love

देशातल्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ” फिर एक बार मोदी सरकार ” असा नारा देऊन पुन्हा एकदा एन डी ए ला संधी देण्याचे ट्विट केले तर काँग्रेसने त्याला ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निरोपाचा पहिला दिवस’ असं नाव दिलं आहे. ‘हा मोदींच्या निरोप समारंभाचा पहिला दिवस आहे. मतदार तयार आहेत,’ असं विधान काँग्रेस प्रवक्ता पवन खेडा यांनी केलं आहे. इतकंच नव्हे तर काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एका कवितेच्या चार ओळी पोस्ट करण्यात आल्या आहेत.

Advertisements

‘बिगुल बजा है, अब जनता की बारी है,
झूठ से लड़ने की, पुरजोर तैयारी है।
झूठों के इस शासन को हम देंगे मात,
कमर कसी है हमने, अबकी जीत हमारी है।।’

Advertisements
Advertisements

अशी कविता काँग्रेसने पोस्ट केली आहे. त्या पोस्टला ‘जीत होगी सच की’ असा हॅशटॅग वापरला आहे. या पोस्टसोबत एक व्हिडिओदेखील शेअर करण्यात आला आहे. एका उगवत्या सूर्याने या व्हिडिओची सुरुवात होते. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची भाषणं आणि सभांची दृश्य या व्हिडिओत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!