मंदिर वही बनायेंगे : आंदोलन सुरूच राहील , सरकारवर पूर्ण विश्वास : संघाची मोदींना क्लिनचिट

Advertisements
Advertisements
Spread the love

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सह-सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी राम मंदिराच्या मुद्यावर मोदी सरकारवर पूर्ण विश्वास व्यक्त केला सून यापुढेही आंदोलन सुरुच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. जोशी म्हणाले की, विद्यमान सरकारच्या (केंद्रातील भाजपा सरकार) निष्ठेबाबत कोणताच प्रश्न नाही. दरम्यान, याच आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिरप्रश्नी मध्यस्थीसाठी ३ सदस्यीय समिती नियुक्त केली आहे. भैयाजी जोशी यांनी राम मंदिरासाठी मोदी सरकारवर पूर्ण विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, सत्तेत असणाऱ्यांचाही राम मंदिराला विरोध नाही, असे आम्ही मानतो. त्यांच्या प्रतिबद्धेबाबत आमच्या मनात कोणतीच शंका नाही, असे म्हणत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारवर विश्वास दर्शवला आहे.

Advertisements

सर्वोच्च न्यायालयाकडून अयोध्या वादावर मध्यस्थी करण्यासाठी ३ सदस्यीय समितीचे गठन करण्यात आले आहे. यावर जोशी म्हणाले की, मंदिरासाठी उचलण्यात आलेल्या कोणत्याही पावलांचे आम्ही स्वागत करतो. मंदिर त्याच जागी होईल आणि त्यासाठी आम्ही कोणतीच तडजोड करणार नाही. मध्यस्थ जर त्या दिशेने गेले तर आम्ही त्यांचे स्वागत करु. जेव्हा ३ सदस्यीय समिती यावर कार्यवाही सुरू करेन त्यावेळी सर्व समजेल. या समितीचे अध्यक्ष सर्वोच्च न्याायलयाचे निवृत्त न्या. एफ एम कलीफुल्ला आहेत. इतर दोन सदस्यांमध्ये आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर आणि जेष्ठ विधिज्ञ श्रीराम पांचू यांचा समावेश आहे. योगायोगाने मध्यस्थी समितीतील तिघेही तामिळनाडूतून येतात.

Advertisements
Advertisements

मंदिर निर्मितीपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे सांगताना ते म्हणाले की, १९८०-९० पासून जे आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत मंदिर पूर्ण होणार नाही. तोपर्यंत आमचे आंदोलन सुरू राहील. न्यायालयाने तत्परतेने यावर निर्णय घ्यावा. दरम्यान, मध्यस्थी समितीसाठी न्यायालयाने ८ आठवड्यांची वेळ निश्चित केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!