Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

सयाजी शिंदे यांना जीवनगौरव पुरस्कार

Spread the love

मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारून आपले स्वतंत्र स्थान निर्माण करणारे प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांना स्व. प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्ट आणि गंगा लॉज मित्र मंडळातर्फे देण्यात येणारा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या मंगळवारी (१२ मार्च) रात्री ८.३० वाजता टिळक स्मारक मंदिरात होणाऱ्या कार्यक्रमात पालकमंत्री गिरीश बापट आणि माजी खासदार यशवंत गडाख यांच्या हस्ते शिंदे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
ढेरे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे इतरही पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. प्रशांत मोरे यांच्या ‘जळत्या दशकाची लोकगाथा’, इरफान शेख यांच्या ‘माझ्यातला कवी मरत चाललाय’ आणि नामदेव गवळी यांच्या ‘भातालय’ या काव्यसंग्रहांना यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे व विजय ढेरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!