Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

सीएएच्या समर्थनार्थ आयोजित संघाच्या परिषदेत गोंधळ , सभागृहात विरोधाच्या घोषणा

Advertisements
Advertisements
Spread the love

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या  समर्थनासाठी दिल्लीत बोलावलेल्या राष्ट्रीय उलेमा परिषदेत  मुस्लिमांच्या दोन गटांमध्ये वाद चिघळल्याने प्रकरण हाणामारीपर्यंत गेले असल्याचे वृत्त आहे. आरएसएसचे नेते इंद्रेश कुमार यांच्या उपस्थितीत हा सगळा प्रकार घडला. देशभरातील उलेमांना या परिषदेसाठी निमंत्रित करण्यात आले होते. काही प्रमुख मुस्लिम नेतेही या परिषदेसाठी आले होते.

Advertisements

दरम्यान, परिषद सुरू असतानाच अचानक काही उपस्थितांनी सीएए आणि एनआरसी विरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यांनी निषेधाचे फलकही झळकावले. त्यामुळे वादाची ठिणगी पडली. सीएए विरोधात घोषणा देणाऱ्यांना बाहेर हुसकावून लावण्याचा प्रयत्न करण्यात आला असता जोरदार राडा झाला. प्रकरण हाणामारीपर्यंत गेले. वाढता तणाव लक्षात घेऊन पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि परिषदेत घोषणाबाजी करणाऱ्यांना ताब्यात घेतले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय मुस्लिम मंचाने या परिषदेचे आयोजन केले होते. सीएए व एनआरसी कायद्यांच्या समर्थनासाठी ही परिषद होती. या कायद्यांबाबत मुस्लिम समाजात जो गैरसमज पसरला आहे तो दूर करण्यासाठी ही परिषद असल्याचा दावा आरएसएसकडून करण्यात आला.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!