Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

राजस्थान : बिकानेरच्या हॉस्पिटलमध्ये महिनाभरात १६२ बालकांचा मृत्यू

Advertisements
Advertisements
Spread the love

राजस्थानच्या बिकानेरच्या पीबीएम हॉस्पिटलमध्ये महिनाभरात १६२ बालकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. निष्काळजीपणाचा झालेला आरोप हॉस्पिटल प्रशासनानं फेटाळून लावला आहे. याआधी बूंदीच्या हॉस्पिटलमध्येही डिसेंबरमध्ये १० नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान कोटा येथील जे. के. लोन हॉस्पिटलमध्ये डिसेंबर २०१९ पासून आतापर्यंत ११० नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांना आवश्यक उपकरणं पुरविली पाहिजेत, ती हॉस्पिटलमध्ये उपलब्ध नाहीत, असे सांगण्यात आहे.

Advertisements

याबाबत सरदार पटेल मेडिकल कॉलेजच्या प्राचार्यांनी बालकांचा मृत्यू झाल्याचे  मान्य केले असले तरी, हॉस्पिटल प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा झाला नाही, असे  सांगून सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. डिसेंबरमध्ये हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये १६२ बालकांचा मृत्यू झाला. मात्र, हॉस्पिटल प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा झालेला नाही. बालकांना वाचवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले होते, असं प्राचार्य एच. एस. कुमार यांनी सांगितले.

Advertisements
Advertisements

दरम्यान या घटनांमुळे राजस्थानमधील आरोग्य सुविधा पुरवण्यात अपयशी ठरलेले  अशोक गेहलोत सरकार बॅकफूटवर आले  आहे. उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी या मुद्द्यावरून आपल्याच सरकारवर टीका केली होती. एकाच महिन्यात ११० बालकांचा मृत्यू झाल्याचं उघडकीस आल्यानंतर त्यांनी हॉस्पिटलचा दौरा केला होता. त्यानंतर त्यांनी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होते. ज्या आई-वडिलांनी मुलांना गमावलं आहे, त्यांना आकड्यांवरील चर्चा मान्य नाही. आम्हाला जबाबदारी निश्चित करावी लागेल. इतक्या मोठ्या संख्येनं बालकं दगावली आहेत. याचा अर्थ कुठेतरी उणीव असेल, असे ते म्हणाले होते.

प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार २०१९ मध्ये विविध हॉस्पिटलमध्ये १६,९१५ बालकं दाखल झाली होती. त्यातील ९६३ बालकांचा मृत्यू झाला. २०१८ मध्ये १६४३६ पैकी १००५ बालकं दगावली. जोधपूरच्या दोन हॉस्पिटलमधील परिस्थिती याहून वेगळी नाही. डिसेंबरमध्ये एनआयसीयू आणि पीआयसीयूमध्ये १४६ बालकांचा मृत्यू झाला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!