Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

आईच्या संमतीने अल्पवयीन नातीवर बलात्कार करणाऱ्या माजी सैनिक आजोबाला आणि आईला जन्मठेप

Advertisements
Advertisements
Spread the love

पाटणा , बिहारमध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एक निवृत्त सैनिक स्वतःच्या नातीवर अनेक वर्षांपासून लैंगिक अत्याचार करत असल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पीडितेच्या आईला याबाबत माहीत असूनही तिनं सासऱ्यांना साथ दिली. या प्रकरणी विशेष न्यायालयानं ६५ वर्षीय निवृत्त सैनिकाला आणि आरोपी सूनेला २० वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. याशिवाय न्यायालयानं या दोघांना दंडाची शिक्षाही सुनावली.

Advertisements

न्यायालयाने ‘दोघांनाही तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंडाची रक्कम न भरल्यास आणखी तीन महिने तुरुंगवास भोगावा लागणार आहे,’ अशी माहिती सरकारी वकिलांनी दिली. पीडितेच्या जबाबानुसार, २०११ साली तिचे वडील बेपत्ता झाले. त्यानंतर तिच्या आजीनंही आत्महत्या केली होती. ‘आरोपी लष्करातील निवृत्त सैनिक आहे. आता तो एका बँकेत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत आहे. घरातील एकमेव कमावणारी व्यक्ती असल्यानं त्याचा त्यानं गैरफायदा घेतला. पीडित मुलीनं अनेकदा आजोबांची तक्रार आईकडे केली. पण तिनंही आरोपीला साथ दिली, ‘ अशी माहिती सरकारी वकिलांनी दिली.

Advertisements
Advertisements

दरम्यान या वर्षी फेब्रुवारीत हा प्रकार उघडकीस आला. पीडितेनं आपल्या शाळेतील मुख्याध्यापकांना सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवून घेतला. त्यानंतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला होता. पीडितेच्या माहितीनुसार, तिचे आजोबा अनेक वर्षांपासून लैंगिक अत्याचार करत होते. लहानपणापासून लैंगिक शोषण केले जात होते. आता पीडिता तिच्या आईच्या कुटुंबीयांसोबत राहते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!