Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पत्नीने जीन्स -टि -शर्ट घातले एवढाच काय तो तिचा गुन्हा….

Advertisements
Advertisements
Spread the love

माणूस कितीही आधुनिक झाला किंवा स्त्री -पुरुष समानतेच्या कुणी कितीही गप्पा मारल्या तरी स्त्रियांच्या बाबतीत पुरुषी मानसिकतेत  काही केल्या बदल होत नाही हेच खरे आहे. पत्नीने तिच्या पसंतीने जीन्स टी-शर्ट घातल्यामुले तिला तिच्या पतीने बेदम मारहाण केल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे.

Advertisements

या प्रकरणात पत्नीला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करत तिचा गळा आवळून हत्या करण्याचा प्रयत्न या पती महाशयांनी केला आहे. या मारहाणीत पीडित महिलेला जबर दुखापत झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी सुधीर जाधव या पतीला अटक केली आहे.

Advertisements
Advertisements

पोलिसांनी या घटनेविषयी सांगितले कि , डोंबिवलीतील कोपर पूर्व परिसरात नवसमर्थ चाळीत सुधीर जाधव आणि पत्नी सुजाता जाधव राहतात. मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सुजाता घरी आल्या. तेव्हा त्यांनी टीशर्ट व जीन्स पॅन्ट हा पोषाख घातला होता. हे पाहून सुधीर संतापला आणि त्याने घरातील काम न करण्यावरून तसेच जीन्स पॅन्ट टी-शर्ट घालण्यावरून सुजाताशी वाद घालण्यास सुरुवात केली. काही क्षणातच संतापलेल्या सुधीरने लाथाबुक्क्यांनी तिला मारहाण करत तिचा गळा दाबून जीवे  मारण्याचा प्रयत्न केला. या मारहाणीत सुजाता यांना जबर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणी सुजाता यांनी डोंबिवली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून पोलिसांनी सुधीरविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!