Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Crime News Update : मुंबईत तरुणाचे अपहरण करून धावत्या कारमध्ये चौघांकडून बलात्कार

Advertisements
Advertisements
Spread the love

कामातुराणां भय ना लज्जा , असे म्हटले जाते ते खरेच आहे. गुन्ह्याच्या बाबतीत लैंगिक अत्याचारासारखे किळसवाणे , विकृत कृत्य करताना गुन्हेगार कोणत्या थराला जातील सांगता येत नाहीं. अशीच एक घटना कुर्ला भागात घडली आहे . कुर्ला येथील हॉटेलबाहेर सेल्फी काढण्यात डांग असलेल्या २२ वर्षीय तरुणाला त्याच्याशी असलेली इन्स्टाग्रामवरील ओळखत दाखवून  चार जणांनी हॉटेलबाहेरून त्याचे  अपहरण करून त्याच्यावर कारमध्ये लैंगिक अत्याचार केला. विनोबा भावे नगर पोलिसांनी या प्रकरणात चार जणांना अटक केली.

Advertisements

या प्रकरणी पोलिसांनी सांगितले कि , कुर्ला पश्चिमेकडील नवाब शीख पराठा या हॉटेलमध्ये पीडित २२ वर्षीय तरुणाने  जेवण केले आणि हॉटेलबाहेर येऊन सेल्फी काढली. हॉटेलचे नाव दिसत असलेला हा फोटो त्याने इन्स्टाग्रामवर टाकला. त्याचा हा फोटो पाहू इन्स्टाग्रामवर असलेल्या दोन तरुणांनी त्याला संपर्क केला आणि त्याच ठिकाणी थांबण्यास सांगितले. काही वेळेतच हे दोघे दुचाकीवरून आले आणि मुन्ना याला मध्यभागी बसवून विद्याविहारच्या दिशेने निघाले. विद्याविहार येथील नीलकंठ बिझनेस पार्कजवळ नेऊन मुन्ना याला एका कारमध्ये बसण्यास सांगितले. या ठिकाणी आणखी दोघे आधीच उपस्थित होते. त्यापैकी एकाने कार सुरू केली आणि इतर तिघांनी धावत्या कारमध्येच मुन्ना याच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्याचा मोबाइल आणि पाकीट काढून घेत डेबिट कार्डवरून २ हजार रुपये काढले आणि दोन हजाराचे पेट्रोलही भरले. त्यानंतर त्याला कारबाहेर फेकून चौघे पसार झाले. मुन्ना याने १०० क्रमांकावर आणि पालकांशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला. घटनेची माहिती मिळताच घाटकोपर पोलिस घटनास्थळी पोहोचले. मात्र हा सर्व प्रकार विनोबा भावे नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने त्यांना याबाबत कळविण्यात आले.

Advertisements
Advertisements

तक्रारीनंतर विनोबा भावे नगर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर तांत्रिक पुराव्यांवरून या चौघांना अटक केली. तर मुन्ना याला वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. प्रभारी पोलिस निरीक्षक माधुरी पाटील, उपनिरीक्षक साळुंखे, येवले यांच्या पथकाने अवघ्या २४ तासांत चौघांना शोधून काढले. या चारही आरोपींना न्यायालयाने १६ डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!