Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : क्षुल्लक कारणावरून युवकाचा खून करणारा गजाआड

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंंंगाबाद : अश्लिल शिवीगाळ केल्याच्या कारणावरून धारदार चाकूने भोसकून ३० वर्षीय युवकाचा खून करणा-यास स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी गजाआड केले. सुरेश दिलीप परसे (वय २५, रा.जुनी जिनिंग झोपडपट्टी, फुलंब्री ) असे मारेक-याचे नाव असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक भागवत फुंदे यांनी सोमवारी (दि.९) दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युनूस बबन पठाण (वय ३०, रा.टाकळी बुद्रक, ता.कन्नड) याचा मृतदेह ८ डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास फुलंब्री बसस्थानकाजवळ मिळून आला होता. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक भागवत फुंदे , सम्राटसिंग राजपूत, उपनिरीक्षक भगतसिंग दुलत, सहाय्यक फौजदार सुधाकर दौड, जमादार विठ्ठल राख, विक्रम देशमुख, नामदेव सिरसाट, सुनील खरात, राजेंद्र जोशी, विनोद तांगडे, बाबासाहेब नवले, ज्ञानेश्वर मेटे, योगेश तरमाळे, उमेश बकले आदींच्या पथकाने तपासाची चव्रेâ फिरवून सुरेश परसे याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, युनूस पठाण याने अश्लिल व अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्यामुळे त्याचा चावूâने भोसवूâन खून केला असल्याची कबूली सुरेश परसे याने पोलिसांना दिली.
ग्रामीण पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, अपर अधीक्षक गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक भागवत पुंâदे यांच्या पथकाने अवघ्या १२ तासात युनूस पठाण याचा खून करणा-यास जेरबंद केले.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!