Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ज्येष्ठ अभिनेत्री वहीदा रहमान यांनी दिली बलात्काऱ्यांवर हि प्रतिक्रिया….

Advertisements
Advertisements
Spread the love

ज्येष्ठ अभिनेत्री वहीद रहमान यांनी हैदराबामधील महिला पशुवैद्यकावर सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणावर  संताप व्यक्त केला असून बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यात माफी नसावी असे मत व्यक्त करताना त्यांनी आरोपींना मृत्यूची नाही तर जन्मठेपेची शिक्षा दिली जावी असे म्हटले आहे. ६ डिसेंबर रोजी बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना हैदराबाद पोलिसांनी चकमकीत ठार केल्यानंतर त्यांनी हि प्रतिक्रिया दिली.

Advertisements

पोलिसांनी तपासासाठी आरोपींना घटनास्थळी नेले असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार करत ठार केले आहे. पोलिसांनी केलेल्या चकमकीनंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असून काहीजण पोलिसांच्या कारवाईचं कौतुक करत आहेत तर काहीजण विरोध दर्शवत आहेत. वहीदा रहमान यांना यासंबंधी त्यांची प्रतिक्रिया विचारली असता त्या म्हणाल्या कि ,  “बलात्कारासारखा गुन्हा माफीच्या लायक नाही. पण तरीही मला वाटतं, एखाद्याची हत्या करण्याचा अधिकार आपल्याला नाही. बलात्काऱ्याला मरेपर्यंत जन्मठेप दिली आहे. आयुष्यभर त्यांना कारागृहात डांबून ठेवलं पाहिजे”.

Advertisements
Advertisements

जर आरोपींना रंगेहात पकडण्यात आलं असले तर कोणताही खटला चालवण्याची गरज नाही असेही  यावेळी त्यांनी म्हटले. “जर तुम्हाला रंगेहात पकडले  असेल तर खटल्याची गरजच काय ? तुम्ही जनतेचा पैसा वाया घालवत आहात,” असं मत वहीदा रहमान यांनी व्यक्त केलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!