Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

धक्कादायक : डोक्यात हातोडा मारून पित्याने केली मुलाची हत्या

Advertisements
Advertisements
Spread the love

चंद्रपूरमध्ये घरगुती वादातून पित्याने केली मुलाची हत्या. हत्या केल्यानंतर त्यांनी स्वतः पोलिस स्टेशनला जाऊन आत्मसमर्पण केले आहे. बल्लारपूर येथील विद्यानगर वॉर्डात ही धक्कादायक घटना सकाळी घडली. राहुल सोपान नगराळे (वय ४२) असं मृतकाचे नाव आहे तर सोपान नगराळे (वय ७४) असे आरोपी पित्याचे नाव असल्याची माहिती बल्लारपूर पोलिसांनी दिली.

Advertisements

मुलगा राहुल याला दारूचे व्यसन होते. मद्यधुंद अवस्थेत तो कुटुंबातील लोकांना सतत त्रास देत होता. मुलाच्या या त्रासाला कंटाळून शनिवारी सकाळी झोपेत असलेल्या राहुलच्या डोक्यावर त्यांच्या पित्यानेच (सोपान नगराळे) लोखांडी हातोड्याने घाव घालून जागीच ठार केले. त्यानंतर घराबाहेर निघून मुलाची हत्या केल्याचे शेजारच्या लोकांना सांगत पोलिस स्टेशन गाठले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!