Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

सुप्रिया सुळे यांचे जीव धोक्यात घालून वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना आवाहन

Advertisements
Advertisements
Spread the love

राज्यातील सत्ता संघर्षाचे वार्तांकन करण्यासाठी वृत्त वाहिन्यांची धावपळ लक्षात घेऊन रिपोर्टींग करणाऱ्या कॅमेरामन आणि वार्ताहराचा फोटो घेऊन त्यावर पत्रकारांना काळजी घेण्याचे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले असून त्यांच्या या ट्विटची चर्चा होत आहे.

Advertisements

आपल्या ट्विटमध्ये सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे कि ,  माध्यमातील मित्र- मैत्रिणींनो, ब्रेकींग न्यूजचं महत्व मी अमान्य करीत नाही, पण रस्ते सुरक्षा देखील महत्वाची आहे. मला हा फोटो पाहून कॅमेरामन आणि ड्रायव्हरची काळजी वाटत आहे. सर्वांना आवाहन आहे की, आपली काळजी घ्या. हे ट्विट करून सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांविषयी आपल्या मनात असलेली भावना व्यक्त केली आहे.

Advertisements
Advertisements

सुप्रिया सुळे यांनी मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत हे ट्विट केले आहे. त्यांचे हे ट्विट शेकडो जणांनी रिट्विट केले असून हजारो लोकांनी या ट्विटला लाईक केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!