Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी

Advertisements
Advertisements
Spread the love

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहे. “माझे लोक अद्याप घरी पोहोचलेले नाही. एअर इंडिया आणि मुख्यमंत्र्यांमुळे ते घरी पोहोचले नाही, तर विमानतळावरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उडवून देईन” , अशी धमकी या व्यक्तीने फोन करून दिली आहे.

Advertisements

दरम्यान यापूर्वीही गेल्या महिन्यात गृह विभागाला फडणवीस यांना जिवे मारण्याचे पत्र प्राप्त झाले होते. त्यानंतर आता विमानतळावरील एअर इंडियाच्या काऊंटरवर हा फोन आल्याने सोनेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एअर इंडियाच्या काऊंटर एका अनोळखी गृहस्थाने फोन केला.

Advertisements
Advertisements

पोलिसांनी सांगितले कि , “माझे चार लोक अद्याप घरी आलेले नाहीत. ते तुमच्यामुळे आले नाहीत. विमानतळावरच मुख्यमंत्र्यांना उडवून देईन” , अशी धमकी या व्यक्तीने दिली आहे . प्रथमदर्शनी ही व्यक्ती माथेफिरू वाटत असली तरीसुद्धा विमानतळ प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेतली आहे. प्रशासनाने दिलेल्या तक्रारीच्या आधारावर सोनेगाव पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड विधानच्या कलम ५०७ अन्वये अदखलपात्र गुन्हा दाखल केला असून, हा फोन नेमका कोणी केला याचा अधिक तपस पोलीस करीत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!