काश्मीर खोऱ्यात राजुरी गावचा जवान शहीद
Advertisements
Advertisements
प्रवरानगर परिसरातील राजुरी गावचे रहिवासी अनिल विष्णू गोरे (वय ३५) हा जवान जम्मू काश्मीर खोऱ्यात शहीद झाला आहे. त्याचे पार्थिव पुण्यापर्यंत विमानाने आणले जाणार असून तेथून लष्कराच्या वाहनाने राजुरी गावात पोहोचेल. त्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. शेतकरी कुटुंबातील अनिल या जवानांच्या दुःखद घटनेने राजुरी गावात शोककळा पसरली. अनिल यांच्या पश्चात पत्नी,आई वडील, लहान मुले असा परिवार आहे, अशी माहिती लोणी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण पाटील यांनी दिली.
Advertisements
