Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पबजीच्या वेडापायी आणखी एका तरुणाची आत्महत्या

Advertisements
Advertisements
Spread the love

‘पब जी’ गेमचे वेड असलेल्या आणि नैराश्याने ग्रस्त असलेल्या तरुणाने आत्महत्या केली. बॉबी शंकर मानके (१९, रा. धाडीवाल लेआउट, नागपूर ) असे मृतकाचे नाव आहे. बॉबीला ‘पब जी’ गेमचे वेड असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली. बारावीनंतर  इंजिनिअरींगच्या पहिल्या वर्षात तो शिकत होता परंतु त्याला ‘पब जी’ गेमचे वेड असल्याने तो सतत गेम खेळत असे. यामुळे त्याचे अभ्यासाकडे लक्ष नव्हते.

Advertisements

अखेर इंजिनिअरींग न झेपल्याने त्याने ते सोडले आणि बीबीए ला प्रवेश घेतला. त्यानंतरसुद्धा गेमचे वेड कमी झाले नाही. त्याचे अभ्यासाकडे दुर्लक्षच होत गेले. अलिकडेच त्याचा बीबीएची परीक्षा झाली. मात्र ही परीक्षासुद्धा चांगली गेली नसल्याने तो या काळात तो नैराश्यग्रस्त झाला. त्याचा वैद्यकीय उपचारसुद्धा सुरू होता. त्याने यापूर्वीसुद्धा आपल्या हाताच्या नसा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याच्या कुटुबीयांनी त्याच्यावर योग्य ते उपचार केले आणि त्यातून तो बचावला. मात्र गुरुवारी पहाटे त्याने घराजवळीस शुभम अपार्टमेंटवर जाऊन तेथील तिसऱ्या मजल्यावरून  उडी घेत  आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!