गुन्हेगारी : आपल्या ” या ” नादापायी “तिने ” १० महिन्याच्याला बाळाला विहिरीत फेकून दिले !!
कामातुराना भय ना लज्जा असे म्हटले जाते ते उगीच नाही. याच कारणातून एका आईने आपल्या १० महिन्याच्या बालकाला विहिरीत फेकून देण्याची घटना घडली आहे . वाशिम जिल्ह्यात आई आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी हि घटना घडल्याचे उघडकीस आल्याने सगळ्यांच्याच काळजाचा थरकाप उडाला. या प्रकरणी पोलिसांनी खुनी महिला आणि एका संशयीतीला कलम 302 आणि 201 अन्व्ये अटक केली आहे.
पोलिसांनी याबाबत सांगितले कि , संगीता माहुलकर असे या निर्दयी आईचे नाव आहे. संगीता आपल्या १० महिन्यांचा मुलगा शौर्यला घेऊन आपल्या बहिणीकडे गेली होती . संगीताचे तिच्या बहिणीच्या नवऱ्यासोबत अनैतिक संबंध होते. शरद खुरसडे असे त्याचे नाव आहे. दोन दिवस राहून संगीता जेव्हा घरी परत आली तेव्हा तीच्या सोबत शौर्य नव्हता. संगीताच्या नवऱ्याने जेव्हा मुलाबद्दल विचारलं तेव्हा तिने आधी उडवाउडवीची उत्तर देण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संगीता आणि शरदचे अनैतिक संबंध होते त्यामुळे ती वारंवार बहिणाीकडे जात असे. तिच्या बिहीणीलाही या संबंधांचा संशय आला होता. मात्र वारंवार सांगूनही तिचं येणं काही कमी झालं नाही. दरम्यान आपल्या संबंधात मुलाचा अडसर होत असल्याने शरद आणि संगीताने मुलाला संपवण्याचा कट रचला आणि गावाजवळच्या विहिरीत तिने शौर्यला फेकून दिलं.
दरम्यान संगीताच्या नवऱ्याला संशय आल्याने त्याने दोन दिवसानंतर पोलिसांमध्ये तक्रार केलीतेंव्हा पोलिसांनी आपला खाक्या दाखवल्यानंतर संगीताने मुलाला विहीरीत फेकल्याची कबूली दिली. या कृत्यात तिच्या बहिणीचा पती शरद खुरसडे हा सुद्धा सहभागी असल्याचं तीने सांगितल्यानंतर पोलिसांनी संगीता आणि शरदला यांच्याविरुद्ध कलम 302 आणि 201 नुसार गुन्हा दाखल केला आणि त्यांना अटक केली या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.