Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

शक्तीप्रदर्शन करीत भरले वंचितच्या उमेदवारांनी दाखल केले उमेदवारी, मध्यमध्ये अमित भुईगळ,पश्चिममध्ये संदीप शिरसाट तर पूर्व मधून आय्यूब पठाण

Spread the love

औरंंंगाबाद : विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले . वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी देखील भव्य वाहन रॅली काढुन शक्तीप्रदर्शन केले. औरंगाबाद मध्य मतदारसंघातून अमित भुईगळ तर औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून संदीप शिरसाट यांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिली. तर पूर्व  विधानसभा मतदारसंघातून आय्यूब जब्बार खान पठाण यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज झालेल्या उध्दव बनसोडे यांनीही  बंडखोरी करीत अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. औरंगाबाद मध्यचे उमेदवार अमित भुईगळ, औरंगाबाद पश्चिमचे उमेदवार संदिप शिरसाट यांनी भडकलगेट येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून रॅलीस सुरूवात केली. भडकलगेटपासून सुरू झालेली रॅली मिलकॉर्नर, औरंगपुरा मार्गे काढण्यात आली होती.

दरम्यान, औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीला बंडखोरीस सामोरे जावे लागले. पूर्व मतदारसंघातून आय्यूब जब्बार खान पठाण यांना उमेदवारी मिळाल्यामुळे नाराज झालेल्या उध्दव बनसोडे यांनी बंडखोरी करीत अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!