Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

नाकाबंदीत तब्बल एक कोटींची रोकड जप्त… 9 जणांना अटक

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबईत कांदिवली पूर्वेला पश्चिम द्रुतगती महामार्गावरील, ग्रोव्हेल्स मॉलजवळील, सर्व्हिस रोडवर एका कारमधून पोलिसांनी तब्बल एक कोटींची रोकड जप्त केली. या प्रकरणी कांदिवलीतील समता नगर पोलिसांनी नऊ जणांना अटक केली आहे.

Advertisements

निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर पोलिसांनी संशयास्पद वाहनांची तपासणी सुरू केली आहे. त्याच अनुषंगाने कांदिवली पूर्वेला पश्चिम द्रुतगती महामार्गावर शुक्रवारी रात्री पोलिसांनी नाकाबंदी केली होती. त्यावेळी एका कारमधून मोठी रक्कम नेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ग्रोव्हेल्स मॉलजवळील सर्व्हिस रोडवर टाटा हेक्सा कारची झडती घेण्यात आली आणि ही रक्कम तब्बल एक कोटी असल्याचे समोर आले. या प्रकरणी पोलिसांनी अमित सेठ यांच्यासह नऊ जणांना अटक केली असून समता नगर पोलीस ठाण्यात अधिक तपास सुरु आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!